Posts

लेख: मित्रहो, चमत्कार झाला..!

लेख: मित्रहो, चमत्कार झाला..!

शुभश्री 🤓 उर्फ....  गुरुभक्त शुभम श्रीरामे 

Contact us:- emahakatta@gmail.com 🎨✍️🌱🤸🧘

Jamsala (जुना),sindewahi 
शिक्षण:( computer engineering diploma poly)




या लेखातील सार असं आहे: 'स्व' ची जाणीव करून देणे...
खरं तरं मला व्यक्तीमत्व विकासावर भर द्या असं सांगायचय...
कारण अनेक संत महात्मे... या एकाच अग्निमंत्राचा वापर करुन... त्यावर कार्य करुन... स्वतःच आयुष्य समाज हितासाठी वाहिलं... एवढं सगळ चमत्कार घडतात कसे...
तुम्हाला जाणुन घ्यायचं आहे... 
चला तर मग माझ्यासोबत... त्या वाटेवर... निवांत चर्चा करू... आणि तुम्ही मला भेटल्यावर नक्कीच म्हणाल shubhashri मित्रा; खरचं चमत्कार झाला...!

(control your mind) जो मनावर ताबा ठेवू शकतो... त्याला कुठलही रणांगण जिंकायला सोप जाईल... असं मला वाटत. मनुष्य देह एक हाडामासाचा पुतळा आहे. त्याच्यात नानाप्रकारचे रसायन आपापली कार्य पार पाडत असतात... पण हेच हार्मोन्स inbalance झालेत तर... 
अगदी तसचं काहीस आपल्या शरीरात होत असते...
म्हणून महाराजांनी मनाची प्रसन्नता राहण्यासाठी गावोगावी मंदिर सामुदायिक प्रार्थना यावर खुप कीर्तने केली... लोकांना अध्यात्माची गोडी लावून दिली पण आज बघतो त्या मंदिराचा वापर फक्त पैसे उकळण्यासाठी होताना दिसत आहे... आपण बघतो, संतांच्या विचारांच उपयोग फक्त पैशासाठी कीर्तनाचा कार्यक्रम करून घेत आहो... आणि पैशाची उलाढाल व्यसनी लोक करत आहेत... संताचे विचार डोक्यात घ्यायचे असतात ना की डोक्यावर घ्यायचे...!

"एकमेव असे संत आहेत... ज्याला आपल्या मृत्यूची नोंद माहीत होती... वेळ माहीत होती काळ माहीत होता..."
" ते संत कोण होते याचं उत्तर तुम्ही मला तुमच्या सुंदर शब्दात लिहून कमेंट कराल..." 

असं काय आहे या चमत्कारात...✓
जो तुमचं मन तुमच्या ताब्यात ठेवायला मदत करत...
त्या संताने हेच केलं असावं म्हणूनच त्यांना त्यांच्या शरीरातील रसायनाचा एवढा गाढा अभ्यास झाला की, त्यांना आपल्या मरणाची नोंद माहिती होती.
त्यांनी स्वतःला असं घडवलं की त्यांच्याबद्दल हे झालं...
*देव पाहवयाशी गेलो! देवची होऊन गेलो!*
म्हंजे मीचं देवबाबा झालो! आणि प्रत्यक्षात देवाचेच अवतार होते ते... यात दुमत नाही.

 तुमचं मन इतरत्र भटकत असेल विचलित होत असेल तर... आपल्याला जे हवय ते मिळवायला मरणप्राय यातना भोगुन अत्यंत कष्टमय जीवन जगूनही ती गोष्ट मिळत नाही तेव्हा... खोल मानसिक आजाराला सामोरे जावं लागतं... काहींचं कुटुंब उध्वस्त होत तर... काहींचं आयुष्य... काहींचं ध्येय तर काहींचं स्वप्न...
 
 प्रभू रुसला... ऐसे म्हणता का..?
 आपणचि दोषी नाही का ?...|| धृ ० ||
 
 प्रभू रुसला ऐसे बोलावे...
 मनमानेची पापे करावे ....
 केले तैसे कोणी भरावे ...
तुकड्यादास म्हणे आम्ही का ? ||१ ||
प्रभू रुसला... ऐसे म्हणता का..?
 आपणचि दोषी नाही का ??



(तुम्ही निवडलेल्या क्षेत्रातील त्या त्या गवसणी घातलेल्या एखाद्या व्यक्तीचे आयुष्य चाचपडून पहा तपासून पहा विश्लेषण करा.)
कोणतीही व्यक्ती उचलून बघा.

(note: Mpsc म्हणते: तुला तुझ्या व्यक्तिमत्त्वामुळे सेलेक्ट करणार... ना की तुझ्या दिसण्याने.. ना की की तुझ्या परिस्थितीमुळे.... तु कसाही का असेना... तुझ्यात जे गुण आहेत ते गुण महत्वाचे आहेत म्हणून आम्ही interview सारखी नजर ओळख करत असतो....)

तुम्हाला असं दिसेल...
त्या व्यक्तीने स्वतःवर काम केलय... 
ना की दुसऱ्याच्या बोलण्यावर... किंवा relative च्या सांगण्यावर...
मी पण याचं मार्गाच अवलंब केला आणि रंगमंचावर... ॲक्टिंग भाषण ... बरबडू लागलो... 
मित्रांनी एकच सवाल केला.... दादा 
तुला, तुझ्या नाटकातील भाषण कसं पाठ!  कस जमतय तुला...! तु यार कमाल आहेस. मी असतो तर... अर्ध्यात थबकलो असतो... आणि लोकांत माझी फजिती झाली अस्ती... गाणे पण गातोस... भजन पण गातोस! आणि लोक तुला वेड्यात काढतात कधीकधी...
 पण सांगु का मित्रहो! मी माझ्या ध्येयावर... माझ्यावर जास्त फोकस करते... ना की लोकांच्या नजरेवर... त्यांच्या टोमण्यावर...

मग मला सांगा,
एखादी मुलगी मला आवडते कारण तिचं mpsc च ध्येय मला आवडल म्हणून...

मनात सतत तिचाच विचार करण... आणि डोक्यात रसायन येत असतात ते.... प्रेम की baate 
पण यामुळे काय होत अभ्यासावर पूर्णतः नियंत्रण नसण!

मी या लेखात स्वतःवर काम करायला लागा असं सांगानारेये.

बहिरंग आणि अंतरंग.... याची जाणीव एकदा का तुम्हाला झाली की... तुमची बस योग्य मार्गावर चालायला सुरुवात होईल. अगदी बुंगाट सुटेल... मला खात्री आहे...

 (bollywood..., झाडीपट्टी , marathi Film industry, mpsc, upsc, स्टेज शो, संचालन, व्याख्यान, स्पीकर इत्यादी... वैगरे वगैरे)

मी एक तुमच्यातलाच लहान मुलगा आहे. तुमचं भाऊ म्हणुन मला समजून घ्या! पण मला खात्री आहे हा लेख तुमचं आयुष्य बदलवून टाकेल... तुमचं जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलवून टाकेल आणि तुम्हाला यश मिळवण्यापासून कोणीही अडवू शकणार नाही... आयुष्यात जे काही निर्णय घ्याला ते योग्य घ्याल...
शेवटी काय...? 'आरोग्यंम धनसंपदा!'

'मला एक अग्निमंत्र सापडलाय हा मंत्र कित्येकांना मिळवण्यासाठी वर्षानुवर्ष भटकाव लागत... पण त्यावेळी... वेळ निघुन गेलेली असते आणि... आपण काहीच करू शकत नाही. आपल्या हातातून निसटून गेलेली अमूल्य अशी ही 'वेळ' परत कधीं आणताच येतं नाही.'

(उद्या करावयाचे ते आज करा काही! भरवसा नाही या देहाचा!---- राष्ट्रसंत)

तुम्हाला जर का आयुष्यात artist, actress, actor, students, former, teacher, तरुण, तरुणी..., (कंसात तुम्हाला जे व्हायचय ते... ) वैगेरे वैगेरे व्हायचं असेल किंवा ते असाल! तर लेख तुमच्यासाठी... आहे!

दोन मिनिट निवांत... एकचित्त होऊन चिंतन करा. एक एक शब्द... शांत होऊन वाचा!

पहाटे पहाटे... वारंवार एखाद्या तरूणीची/ तरुणाची आठवण जर का तुम्हाला सतावत असेल आणि करियर संबंधी वारंवार चिंताग्रस्त रहावं लागत असेल... भविष्याविषयच करियर विषयच... निर्णय घेताना चुकीचा निर्णयास बळी पडावं लागत असेल तर... अभिनंदन! तुमचं अधोगतीच्या मार्गाने चालायला सुरुवात झालेली आहे... आणि मला खात्री आहे तुम्हाला जे नकोय तेच घडेल! आणि हा आनंद तुमच्यासाठी गगनात मावेनासा असेल...! लोकांच्या नजरा आणि त्यांच्यातून वेगळं झाल्याची जाणिव...

काळजी करू नका... मी योग्य तेच सांगणारेये... मी या एकेक शब्द रूपातून तुमच्या सोबत आहे...
चला तर.... तो चमत्कार काय आहे जाणुन घेऊया....

मलाही या विदयार्थी जीवनात वारंवार असल्या गोष्टीचा सामना करावा लागतोय.... 

आणि याचा सर्वात वाईट परिणाम माझ्या... पुढील भवित्यावर झालाय...
म्हंजे आपण त्याला एक प्रकारे प्रेमचाळे म्हणू शकतो... किंवा तुम्ही म्हणता त्याप्रमाणे अर्थ धरल्यास आकर्षण... वैगरे म्हणू शकतो.... किंवा तुम्ही... नातेसंबंधांचा विचार करताय... एखादे विद्यार्थी आहात... कामात आणखीच वैताग येत असेल सतत चिडचिड होत असेल....(कंसात तुम्हाला जे वाटते ते व्हायचं असेल ते...) वैगरे... वैगेरे.....

वारंवार एखाद्या नकारात्मक गोष्टीची भीती वाटणं!, 'मला हे जमेल का? मला हे करता येईल का? माझ्या हातुन होईल का?' किंवा याउलट परिस्थिती... 'होय मला जमेल. मी (mpsc/upsc, engineering, medical etc.) many more...professional courier option...) (कंसात (तुम्हाला जे ध्येय प्राप्त करायचय ते...) निश्चितच पास होणारेय... मला आत्मविश्वास आहे प्रचंड आत्मविश्वास आहे.'
हा ओढून ताणून आणलेला.... स्वतःवरील एक जबाबदारी म्हणुन आईवडिलांचा नातेवाइकाच स्वप्न... पुर्ण करण्यासाठी... त्यांच्यात सर्वात मोठं अभिमान निर्माण करण्यासाठी असा खोटं स्वार्थ उराशी बाळगून.... स्वतःलाच फसवत चाललेला खोटा आत्मविश्वास...!

[ Hint: तुम्ही घेत असलेल करियर ऑप्शन तुमचं हेतू सांगत असतो! खरोखर स्वतःला विचारा... लोकांमध्ये खोटं मान सन्मान जिंकायचं असेल तर... शिक्षणात अडकु नका कारण... तो मार्ग तुमच्यासाठी नाहीच पैसा कमविण्यासाठी कित्तेक मार्ग आहेत.... जर पैशा व्यतिरिक्त म्हणत असाल तर...(अनुभव घेणं, आनंद, मनस्वी आवड, छंद ,... त्या त्या विषयात पारंगत कला शिकण..., अंतर्मुख करणारे जे मला स्वप्नपूर्तीची लोककल्याणासाठी जाणिव करुन देईल) असं असेल तर... निवांत त्याच मार्गाने जा... आणि गंमत म्हणजे काय माहितीये... आपल्याला जे आवडत ते शिकताना... जी मजा येते ना... हा आनंद कुठल्याच बाजारात पैसै देऊन घेताच येत नाहीं हा!  ]

खरं खरं सांगा! मनापासून... अगदी शांत होऊन चिंतन करा... आणि सांगा हे सगळं खरंय ना!

मित्रांनो, होतय ना तुमच्या सोबत अनेकदा असं!

'पण खरं सांगु का! कित्येकांना जे हवंय ते मिळतं मात्र नाही....' असं का बर होत असेल... सांगा बर...
अगदी बरोबर ओळखलत..! त्याचं एखाद कारण असं असु शकतो तो त्या क्षेत्रात... ' स्व' ची जाणिव घेऊन कधीच उतरलेला नसेल कदाचित... माझ्या मते... तो बाहेरील गोष्टीला भाळून.... त्या त्या क्षेत्रात उतरलेला अस्तो! ( तो कित्तेकांचे बोलणे ऐकून त्या त्या क्षेत्रात उतरलेला असं म्हणायचंय मला...)
किंवा तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे त्याने ('कंसात तुम्ही जे असाल ते...' ने) पाहिजे तेवढे प्रयत्न... तेवढा अभ्यास, अध्ययन नसेल केला किंवा त्याला अनेक (सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, व्यावहारिक) अडचणीचा सामना करावा लागला असेल वैगरे वैगरे...

परंतु मित्रहो... या सगळ्याच मुळ कारण कधी आपण ओळखुच शकलो नाही... बाहेरील गोष्टीला नाहक बळी पडून आपणही तसचं मटकण्याच प्रयत्न करत आलेलो...

मी पण या चक्रव्यूहात अडकलेलो होतो... पण मला ... प्रत्येक क्षणी एक आवाज साद घालत असायचा.... आतुन येणारा तो आवाज... ओळखीचा वाटायचा... प्रत्येक वेळी... तो माझ्या अंतर्मनात गुणगुणत असायचा. मला शांत करत असायचा. मला आपलस करुन टाकायचंचा. मी 'मी कोण आहे?' याची जाणीवच हरवून जायचो... तो आवाज... एखाद्याचा मंत्रजपच असावा असं काहीसं माझ्यासोबत व्हायचं... (उदाहरण द्यायचं झाल्यास: कुणी जय भीम म्हणतो... तर कुणी जय गुरू... कुणी रामजप करतो... कुणी कृष्णजप...! कुणी विठ्ठल... पांडुरंग! कुणी जय हरी... तुमच्या तुमच्या श्रद्धेनुसार... (कंसात वैगरे वैगरे...)

मी खोलवर चिंतन करायला लागलो... त्या आवाजाचा अर्थ मी स्वतःच्या अंतर्मनात डोकावून शोध घेऊ लागलो... आणि हे सगळं करताना मला कसलच त्रास होत नव्हता... उलट अंगात वेगळीच ऊर्जा स्फुरू लागली. मला चिंतन करायला आणखीनच भाग पाडू लागली. आणि एक दिवस. मला त्या चमत्काराची अनुभूती झाली... 
कोण आहे मी?, काय आहे मी?, माझं जिवन म्हंजे काय...?, माझे कार्य म्हंजे काय?, मी जे करतोय ते कशासाठी?, मी खरचं मी आहे की... अजुन कोणीतरी...?
मी मीच माझ्यात नाहिये... थबकलो...! ठेचाळलो...! पुन्हा तोच आवाज...! मला आपल्याकडे बोलवत आहे असं काहीसं होत होतं...!

मन वेगाने धावू लागल...! आता मी माझ्या मार्गात येणाऱ्या मुलांत रमायला प्रयत्न केला पण मला कधी त्यांच्यात रुळता आले नाही... मला त्या सगळ्यापासून आपसूकच दुर राहण्याचा लळा लागला... एकांतात रमायला लागलो... मला कोणी काहीही बोललेले शब्द लागायचे नाहीत... माझं मन आपसूकच मला मित्रांपासून वेगळं करू लागला... याचा उलट परिणाम झाला... मला कुठले मित्र नाही म्हणुन एकांतात रडु लागलो... एकांतात रमु लागलो... एकांतात बडबडू लागलो...

हाच एकांत मला माणुसकीची अजीब... दवा देवु लागला माझ्या रक्तात...माणुसकीचा अजब रसायन आपसूकच तयार होऊ लागला... माझ्या जिवलग शिक्षकांचे विचार, गांधी, शाहू ,फुले , आंबेडकर..., राष्ट्रसंत , संतांचे विचार, वैचारिक विचार, विवा शिरवाडकर, कुसुमाग्रज, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे विचार... , साने गुरुजी, महिला सुधारक इत्यादी वैगेरे वैगेरे... सतावत होतें.... वारंवार मला वेडा करुन जात होते... मी कधीकधी खोलवर चिंतन करायला... पण मला खूप आनंद होई... काही विचार ऐकुन दुःखी कष्टी पण होई... छ. शिवाजी महाराज, छ. संभाजी महाराज, तानाजी, बहिर्जी.... शिवाजी सावंतांच्या पुस्तकांनी तर बेभान करुन टाकले... पण याही पलिकडे तो वेगळा होता. तो म्हणजे मला ऐकू येत असणारा तो एकमेव आवाज. मला सदैव सतावतोय तो एकमेव अद्भुत आवाज... या एका आवाजाने माझे जीवन बदलून गेले... आता मला ना कशाचा मोह. ना कुठलीही भौतिकवस्तू गोष्ट जवळ जोपासण्याचा स्वार्थ... 

(स्व जाणीव, विचारविलास, प्रेम, माया, ममता, स्वार्थ, भय, मोह, देह, दानव, आत्मा, परमात्मा, भौतिक सुख, अध्यात्मिक सुख, चमत्कारी शक्ती, यशाचा पासवर्ड) 

एक अद्भुत साक्षात्कार....झाला....मग,
आता कसले.... मित्रांच्या पार्ट्या... ना बाते... ना बट्ट्या... ना प्रेमाच्या अनैतिक चर्चा! ना लैंगिकतेच्या आकर्षित गट्टया...!

 कुठलं तरुण तरुणी मित्र म्हणुन आलेच जवळ तर...  त्यांच्या नजरेला नजर भिडवून बोलायला लागलो... त्यांना विचलित करत असलेल्या प्रश्नांचे उत्तर द्यायला लागलो... त्यांना हसवू लागलो... रडवू लागलो... रमवू लागलो...

माझ्याशी भेटलेला एखादं व्यक्ती मला जाणीव करुन द्यायला की, 'तु एखादी वाक्य बोललास की... वेगळीच अनुभूती होते...' असं ऐकल्यावर... मला थोडस छान वाटायचं... पण नंतर... मला माझेच प्रश्न विचलित करायचे... 'हे सगळ खरं असताना मग  मी तुमच्यात मिसळत का बर नाही...' हा एकच प्रश्न मला खूप त्रास देऊन जायचा... मला सतावून जायचा... मला आतुन खचवून टाकायला..., आणि लगेल तो अंतर्मनातील आवाज आणखीनच साद घालायचा... मला वाऱ्याच्या वेगाने आनंदाने झुमुवू लागायचा.... मला वेगळं असण्याची जाणीव करुन द्यायचा.... आणखी एक किस्सा....कधि कधि झाडीपट्टीच लेक म्हणुन उगाचच जास्त बडबडत सुटायचो... तेव्हां त्यावर चर्चा होऊन जाई. मित्र म्हणायचे, 'तू... खुप बडबडतेस..!' यांची मला पूरेपूर खात्री होतीच... कोणीच परफेक्ट नाही... कारण एखाद सॉफ्टवेअर बनवल्यावर काहीतरी bug 🪲 असतातच... तसचं माझही झालं... माझ्या मते ते माझ्या वारसा हक्कातून... रक्तातुनचं आलं असावं कदाचित! पण cross ❌ checked  केल्यावर तसही जाणवलं नाही.😉

कोण होता तो आवाज! कोणाचा होता तो आवाज...
आणि काय म्हणायचा...!

ज्या आवाजाने मीच माझं राहिलो नाही...
अरे बाबा, या एका आर्तआवाजासाठी मी वेडापिसा झालो तो म्हंजे... राष्ट्रसंतांच्या साहित्यावरील पहिल्या पानावरच वाक्य होत... तो!
तो आवाज म्हंजे तुमच्या सारख्या सज्जनासाठी तो एक वाक्य होत... आणि माझ्यासाठी अग्निमंत्र...

"कोटी कोटी रूप जळती तुझिया अंतरी! बघशी काय बाहेरी! सुजणा...!"

तो पुस्तक होत: ग्रामगीता

त्या एका आवाजाने... एका वाक्याने जर माझ जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलू शकत असेल तर...'ग्रामगीता' या पुस्तकात काय अजब चमत्कार दळलेलं असेल हे मी वेगळं सांगायला नको असं मला वाटते...

तुमचं अध्याम कोणतही असो... सगळे हेच सांगनार...

सर्वांना सप्रेम जय गुरू!!!🧘🚩🤸🌱✍️🎸🌍🎨👍

बोलो जी श्री गुरुदेव की... जय!
बोलो जी श्री गुरुदेव की... जय!!
बोलो जी श्री गुरुदेव की... जय!!!
सद्गुरूनाथ महाराज की जय 🚩...

जय गुरुदेव 🚩

About the author

Mahakatta team
(जिल्हा चंद्रपूर, महाराष्ट्र). सरकारी योजना लोकांना सोप्या भाषेत कळाव्या याच्यासाठी मी प्रयत्न करत आहे.

Post a Comment