RTE Ujjwal Yojana 2025: प्राइवेट शाळेत मोफत प्रवेशाची सुवर्णसंधी! लगेच अर्ज करा RTE उज्ज्वला पोर्टलवर!


RTE Ujjwal Yojana 2025: प्राइवेट शाळेत मोफत प्रवेशाची सुवर्णसंधी! लगेच अर्ज करा RTE उज्ज्वला पोर्टलवर! 

RTE Ujjwal Yojana 2025: गरीब व गरजू कुटुंबांतील मुलांना खासगी शाळांमध्ये मोफत शिक्षण मिळावं यासाठी ‘आरटीई’ म्हणजेच राईट टू एज्युकेशन (शिक्षणाचा हक्क) योजनेअंतर्गत 2025-26 शैक्षणिक वर्षासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. या योजनेतून मुलांना खासगी शाळांमध्ये मोफत प्रवेश दिला जातो आणि शिक्षण, गणवेश अशा विविध सुविधा मोफत मिळतात.

राज्य सरकारने यासाठी RTE उज्ज्वला पोर्टल सुरु केलं असून, त्यावरून ऑनलाइन अर्ज भरता येणार आहेत. ज्या पालकांना आपल्या मुलांना खासगी शाळांमध्ये मोफत शिकवायचं आहे त्यांनी लवकरात लवकर या पोर्टलवर अर्ज करावा.



  • आरटीई योजना म्हणजे काय?
  • RTE प्रवेश 2025 – महत्त्वाच्या तारखा
  • पात्रता कोणासाठी?
  • ऑनलाइन अर्ज कसा कराल?
  • निष्कर्ष

आरटीई योजना म्हणजे काय?

आरटीई (RTE) म्हणजे शिक्षणाचा मूलभूत हक्क. या योजनेअंतर्गत खासगी शाळांमध्ये 25% जागा गरीब व वंचित गटातील विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या असतात. या मुलांचे शिक्षणाची फी सरकार स्वतः भरते. त्यामुळे पालकांना कोणतीही आर्थिक अडचण न येता त्यांचे मूल दर्जेदार शिक्षण घेऊ शकते.


जर एखाद्या खासगी शाळेने या योजनेतून विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यास नकार दिला, तर सरकार त्यांची शाळा मान्यता रद्द करू शकते.


RTE प्रवेश 2025 – महत्त्वाच्या तारखा

ऑनलाईन अर्ज सुरू: 13 जून 2025

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 23 जून 2025

निकाल जाहीर होईल: 25 जून 2025

प्रवेश प्रक्रिया सुरू: 1 जुलै 2025 ते 11 जुलै 2025

पात्रता कोणासाठी?

ज्या कुटुंबांची वार्षिक उत्पन्न 1.8 लाखांपेक्षा कमी आहे.

मुलांची वय मर्यादा:

प्री-प्रायमरी: 3 ते 5 वर्षे

यूकेजी: 4 ते 6 वर्षे

इयत्ता पहिली: 5 ते 7 वर्षे

ऑनलाइन अर्ज कसा कराल?

RTE अधिकृत वेबसाईटवर जा:

‘Student Registration’ किंवा ‘विद्यार्थी नोंदणी’ या पर्यायावर क्लिक करा.

विद्यार्थ्याची माहिती भरा – नाव, जन्मतारीख, पालकांचे नाव इत्यादी.

आवश्यक कागदपत्रे (उदा. उत्पन्न प्रमाणपत्र, जन्मतारीख, रहिवासी दाखला) अपलोड करा.

अर्ज नीट तपासून शेवटी ‘Submit’ बटनावर क्लिक करा.


निष्कर्ष

गरीब कुटुंबांतील मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावं हा या योजनेचा उद्देश आहे. तुम्ही पात्र असाल तर अजिबात संधी दवडू नका. आजच RTE उज्ज्वला पोर्टलवर अर्ज करा आणि तुमच्या मुलाचं भविष्य उज्ज्वल करा!


About the author

Mahakatta team
(जिल्हा चंद्रपूर, महाराष्ट्र). सरकारी योजना लोकांना सोप्या भाषेत कळाव्या याच्यासाठी मी प्रयत्न करत आहे.

Post a Comment